Ad will apear here
Next
मानवी साखळी आणि सायकल रॅलीद्वारे सोलापुरात मतदार जागृती


सोलापूर : भव्य सायकल रॅली आणि सुमारे सात हजार नागरिकांनी केलेली साखळी यांच्या माध्यमातून सोलापुरात मतदार जागृती करण्यात आली.

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा मतदार जनजागृती समितीमार्फत सोलापुरात सायकल रॅली आणि मानवी साखळीचे आयोजन केले होते. सायकल रॅलीत सुमारे एक हजार विद्यार्थी, अधिकारी, नागरिक आणि मतदार सहभागी झाले होते. इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर करण्यात आलेल्या साखळीत सुमारे सात हजार नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व मतदार सहभागी झाले होते.

सायकल रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, ‘स्वीप’ समितीचे सहअध्यक्ष अंकुश चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड आदी उपस्थित होते.



‘यशस्वी व सदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात १८ एप्रिलला सोलापूर लोकसभा मतदारसंघात, तर २३ एप्रिलला माढा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांनी मतदान करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले.  

लोकशाही सदृढतेसाठी मतदान करण्याचा संकल्प करूया, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’ समितीचे अध्यक्ष डॉ. भारुड यांनी केले. मतदार जागृतीसाठी काढण्यात आलेली सायकल रॅली चार पुतळा हुतात्मा चौक येथे सुरू होऊन डॉ. आंबेडकर चौक, डफरीन चौक, कामत हॉटेल, व्हीआयपी रोड, सात रस्ता चौक, रंगभवन चौक, जिल्हा परीषद, सिद्धेश्वर प्रशालामार्गे जाऊन इंदिरा गांधी स्टेडियम येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.



मतदार जागृतीसाठी मानवी साखळी
मतदारांमध्ये जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढून लोकशाही बळकट व्हावी यासाठी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर मानवी साखळी करण्यात आली. या साखळीच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगाचा लोगो साकारण्यात आला. या साखळीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भोसले यांनी उपस्थितांना मतदानाबाबत शपथ दिली.

या वेळी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, प्रशासन अधिकारी सुधा साळुंके, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, क्रीडा अधिकारी नजीर शेख आदी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZRRBZ
Similar Posts
‘आई... बाबा... मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’ सोलापूर : ‘आई... बाबा... तुम्ही मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा...!’ असा संदेश सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या पालकांना पत्राद्वारे देणार आहेत. सोलापूर व माढा या लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम राबवला जात आहे.
सोलापुरात घंटागाडी करणार मतदारांमध्ये जनजागृती सोलापूर : जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत सुमारे साडेचारशे घंटागाडीच्या सहाय्याने मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून ‘स्वीप’ उपक्रम राबवला जात आहे.
‘स्वत:च्या घराचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही’ सोलापूर : ‘स्वत:चे घर उभारण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. मातीच्या घराचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्क्या घरात झाले. सुरक्षितपणे जगता येऊ लागले,’ अशा शब्दांत अनेक लाभार्थींनी दोन जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या.
‘चारा छावण्यांचे संचालन काटेकोरपणे करा’ सोलापूर : ‘जिल्ह्यातील चारा छावण्यांचे संचलन काटेकोरपणे करा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language